सर्वसामान्यांना झटका ! ‘या’ कारणामुळे लवकरच ‘महाग’ होऊ शकतो विमान ‘प्रवास’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रेल्वेचे प्रवासभाडे महागले आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या. त्यानंतर नवीन वर्षाच्या दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. आता विमान प्रवास सुद्धा महागणार आहे. विमानाच्या इंधनाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Aviation Turbine Fuel (ATF) मध्ये 2.6 टक्के वाढ झाली आहे. याच इंधनावर विमाने उडत असतात. आता या इंधनाचे दर वाढले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने विमान प्रवासभाडे वाढण्याची शक्यता आहे. त्यातच, अनेक एअरलाइन्स अगोदरच तोट्यात आहेत. विमानाच्या इंधनाचे दर सध्या 64.32 लीटर आहेत. हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे.

पेट्रोलचे दर 75.25 रुपये प्रति लीटर आणि डीझेलचे दर 68.10 रुपये प्रति लीटर आहेत. याशिवाय विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर महागला आहे. याच्या किमती 19 रुपये प्रति सिलेंडर वाढल्या आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती सध्या वाढल्या आहेत. भारत आपल्याला लागणारे 84 टक्के कच्चे तेल आयात करतो. कच्च्या तेलात मागील काही महिन्यांपासून वाढ होत आहे. ऑक्टोबर 2019 ते 59.70 डॉलर प्रति बॅरल होते. नंतर नोव्हेंबरमध्ये याची किंमत 62.54 डॉलर झाली. यानंतर डिसेंबरमध्ये हे 65 डॉलर प्रति बॅलरवर पोहचले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/