‘रामायण-महाभारत’ नंतर दूरदर्शननं दिली आणखी एक Good News ! लवकरच सुरू होणार ‘श्री कृष्णा’

पोलिसनामा ऑनलाइन –डीडीवर रामायण आणि महाभारत या मालिकांनी रिपीट टेलीकास्टमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. यानंतर शक्तीमान, चाणाक्य हे शोही प्रेक्षकांना पुन्हा पाहण्याची संधी मिळाली. चाहत्यांना दूरदर्शननं आणखी एक गिफ्ट दिलं आहे. आता दूरजर्शनवर श्री कृष्णा ही मालिका पुन्हा सुरू करणार आहे. रामायण या मालिकेनं तर टीआरपची अनेक रेकॉर्ड तोडले होते.

या मालिकेचं डायरेक्शनही रामानंद सागर यांनीच केलं आहे. प्रसार भारतीनं याबाबत सोशलवरून माहिती दिली अहे. श्री कृष्ण ही मालिका सर्वात आधी 1993 साली दूरदर्शनच्या मेट्रो चॅनलवर प्रसारीत केली जायची. यानंतर 1996 साली दूरदर्शनवर प्रसारीत झाली होती. ही मालिकाही आता दूरदर्शनवरच प्रसारीत केली जाणार आहे.

रामायण आणि महाभारत प्रसारीत झाल्यानंतर अनेकांनी या मालिकेची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मगाणीची दखल घेत आता प्रसार भारतीनंही प्रेक्षकांची ही मागणी पूर्ण केली आहे.

https://twitter.com/Rmnpatel21/status/1251004820447608832

कोरोनामुळं देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 3 मे 2020 पर्यंत असणार आहे. चाहतेही अनेक जुन्या मालिका पुन्हा पहायला मिळतील म्हणून उत्सुक आणि आनंदी झाले आहेत.