दिलासादायक ! कोरोना मधून बरे झाले 300 हुन जास्त तबलिगी जमाती, बांधवांचा जीव वाचवण्यासाठी ब्लड प्लाझ्मा ‘डोनेट’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमुळे देशातील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाली. आता त्यातील अनेक तबलिगी हे बरे झाले असून ते दुसर्‍या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी पुढे आले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आपला प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रविवारी सुलतानपुरी सेंटरमध्ये बरे झालेल्या ४ जमातच्या सदस्यांनी आपला प्लाज्मा दान केला.

त्याचप्रमाणे ३०० हून अधिक तबलिगी जमातच्या सदस्यांनी प्लाझ्मा दान करण्याच्या दिल्ली सरकारचे सहमती अर्ज भरुन दिले आहेत. त्याचप्रमाणे देशभरातील अनेक ठिकाणी कोरोनामुक्त रुग्ण आपला प्लाज्मा देण्यासाठी पुढे येत आहेत.