अरे देवा, किशोर बियाणी यांनी हे काय केलं, व्यवसाय तर विकला, 15 वर्षे काहीच करता येणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एके काळी भारताच्या रिटेल उद्योगाचे राजे म्हणवणारे किशोर बियानी यांनी फ्यूचर ग्रुप काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींच्या रिलायन्सला विकला. कर्जाच्या संकटात अडकलेल्या बियानी यांनी आपला रिटेल ग्रुप 24713 कोटी रुपयांना मुकेश अंबानींच्या रिलायन्सला विकला. रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या या कराराची अनेक दिवस चर्चा सुरु होती. हा व्यवहार झाल्यानंतर देखील त्याबद्दल चर्चा सुरुच आहे.

बियाणी आणि अंबानी यांच्यात झालेल्या या व्यवहारातील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोघांच्यात झालेल्या करारानुसार किशोर बियाणी आता पुढील 15 वर्षे रिटेल व्यवसाय करु शकणार नाहीत. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या नॉन कॉम्पिटेंन्स क्लॉजनुसार किशोर बियाणी यांच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्याला पुढील 15 वर्षे रिटेल व्यवसाय सुरु करता येणार नाही. सर्वसाधारणपणे नॉन कॉम्पिटेंन्स क्लॉज 3 ते 5 वर्षासाठी लागू असतो. पण या व्यवहारात तो 15 वर्षे इतका मोठा आहे.

या व्यवहाराशी संबंधित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्षेत्रात रिलायन्स व्यवसाय करत आहे त्या क्षेत्रात फ्यूचर ग्रुप अथवा किशोर बियाणी नवा रिटेल व्यवसाय सुरु करु शकणार नाहीत. जो रिलायन्सला आव्हान देईल. बियाणी होम रिटेलिंग व्यवसाय सुरु करु शकतात. कारण रिलायन्स त्या व्यवसायात नाहीत.

किशोर बियाणी यांची Praxis Retil ही कंपनी रिटेलचा व्यवसाय करते. होम टाऊन स्टोअर याच कंपनीचे उत्पादन असून बियाणी आणि कुटुंब हा व्यवसाय सुरु करु शकतात. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये होम टाऊनचा महसूल 702 कोटी रुपये इतका होता. रिलायन्स सोबतच्या व्यवहारात फ्यूचर ग्रुपने रिटेलमधील या कंपनीला मात्र विकले नाही. त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे.