Jio-Facebook डील : आता जिओ Mart WhatsApp सोबत करणार काम, जोडणार कोट्यावधी किराणा दुकानदार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यासह जिओने प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि फेसबुकच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपमध्येही व्यावसायिक भागीदारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कराराअंतर्गत फेसबुकने जिओचा 9.99. टक्के हिस्सा 43,574 कोटीमध्ये खरेदी केला आहे.

वास्तविक, हा करारामधून भारतात किरकोळ खरेदीचा मार्ग बदलू शकतो, कारण रिलायन्सचा जिओ मार्ट आणि फेसबुकच्या व्हॉट्सअ‍ॅपने देशातील कोट्यावधी किराणा दुकान आणि ग्राहकांना जोडण्याची तयारी केली आहे. अशाप्रकारे रिलायन्स रिटेल आता या व्यवसायात गुंतलेल्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला कडक टक्कर देणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बुधवारी एका निवेदनात ही माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, रिलायन्स रिटेलची ही व्यावसायिक भागीदारी जियोमार्ट प्लॅटफॉर्मवर व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आणि मेसेंजरवर छोटे व्यवसाय जोडण्यासाठी केली गेली आहे. व्हॉट्सअ‍ॅप पहिल्यापासून भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना जोडण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत आहे.

कधी झाली होती लॉन्चिंग कधी?
गतवर्षी 31 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला आव्हान देण्यासाठी रिलायन्सने आपल्या नवीन ई-कॉमर्स उपक्रम ‘जिओ मार्ट’ चे सॉफ्टवेअर बाजारात आणले. त्यास ‘देशाचे नवीन दुकान’ असे नाव देण्यात आले. सध्या नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण विभागातील ऑनलाईन दुकानदार जिओ मार्टच्या सेवेचा लाभ घेत आहेत. लवकरच इतर शहरांमध्येही याची सुरूवात होईल.

काय आहे योजना?
मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठे ऑनलाइन-टू-ऑफलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी रिलायन्स बऱ्याच काळापासून काम करत आहे. सध्या देशात 15,000 किराणा दुकानांचे डिजीटलकरण करण्यात आले आहे. रिलायन्स ग्राहकांना त्यांच्या हाय-स्पीड 4 जी नेटवर्कद्वारे त्यांच्या जवळील किराणा दुकानांशी जोडेल, जेणेकरून ग्राहकांना घरात बसून किराणा दुकानातून सामान मिळू शकेल.

एवढेच नव्हे तर जिओ मार्ट आपल्या युजर्सला 50 हजाराहून अधिक ग्रोसरी प्रोडक्ट्स, फ्री होम डिलीवरी, नो क्वेस्चन आस्क्ड रिर्टन पॉलिसी आणि एक्सप्रेस डिलीवरी प्रॉमिस ऑफर करत आहे. या करारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे कर्जाचे ओझे कमी होईल. फेसबुक भारतात आपले स्थान मजबूत करेल. त्याच्यासाठी भारतही यावेळी सर्वात मोठा बाजार आहे.