कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून नक्की घ्या ‘ही’ कागदपत्रे, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर, कार, किंवा अन्य कोणताही मोठा खर्च समोर आल्यास आपण कर्ज घेऊन आपली गरज पूर्ण करतो. यानंतर अतिशय शिस्तीत कर्जाचे हप्ते फेडत राहतो. कर्ज फिटल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे आपण समजतो. परंतु, आता तुम्ही नो ड्यूज सर्टिफिकेट (एनडीसी) घेणे जरूरी आहे. जुने बँक खाते बंद करण्यापूर्वी जाणून घ्या 4 गोष्टी, होणार नाही नुकसान…
दुसर्यांदा कर्ज घेताना येईल अडचण
जर तुम्ही हे सर्टिफिकेट घेतलेले नाही तर दुसर्यांदा कर्ज घेताना तुम्ही हे सिद्ध करू शकणार नाही की मागील कर्ज चुकते केले आहे. कर्ज चुकते केल्यानंतर कर्जदाराला बँक नो ड्यूज सर्टिफिकेट किंवा क्लाजर लेटर देते. काही बँका या सोबत स्टेटमेंट ऑफ अकाऊंटसुद्धा देतात.
नो ड्यूज सर्टिफिकेट न मिळाल्यास काय कराल
बँक कर्ज घेणार्या व्यक्तीला पत्र लिहून सूचित करते की, आपण आपले मुळ कागदपत्र घेऊन जावेत. जर असे पत्र बँकेकडून आले नाही तर कर्जदाराने संपर्क साधावा. तसेच, बँकेकडून मिळालेली एनडीसी हरवल्यास बँकेशी संपर्क साधून डुप्लीकेट कॉपी घ्या.
बँक मागते दोन वर्षाचे स्टेटमेंट
बहुतांश बँक लोन देण्यापूर्वी ग्राहकाकडून दोन वर्षाचे बँक स्टेटमेंट मागतात. जर कर्ज देणार्या बँकांना या स्टेटमेंटमध्ये कोणताही ईएमआय दिसल्यास ते तुमच्याकडून लोनच्या स्टेटमेंटचा ईएमआय मागतात. क्रेडिट रिपोर्टमध्ये सुद्धा कर्ज घेणार्या ग्राहकाची पूर्ण माहिती असते. होम लोन, कार लोन, टू-व्हीलर लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी इत्यादीसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज असते.
लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी
प्रॉपर्टीवर लोन घेण्याची प्रक्रिया होम लोनप्रमाणे आहे. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये मालकी हक्क कर्ज घेणार्याकडेच असतो. बँकेकडे अधिकार असतो की, कर्जदार डिफॉल्टर झाल्यानंतर प्रॉपर्टी जप्त करू शकते.
कार लोन
लोन घेऊन खरेदी केलेल्या कारचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) बँकेच्या नावाने होते. कर्ज फेडल्यानंतर आरसी खरेदीदाराच्या नावावर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा. नोंदणी प्रमाणपत्र आणि इन्शुरन्स पॉलिसीसाठी अर्ज करताना बँकेकडून मिळालेला क्लोजर रिपोर्ट आणि अर्ज द्यावा लागेल.
यावर मॉर्गेज अपडेट करून घ्या
जर तुम्ही होम लोन फेडले असेल तर इन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट (ईसी) वरून मॉर्गेज हटवून अपडेट करून घ्या. यासाठी क्लोजर लेटरच्या प्रत घेऊन रजिस्ट्रार कार्यालयात संपर्क करू शकता. ईसी याबाबतीचा पुरावे असते की, प्रॉपर्टीवर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही. अशी प्रॉपर्टी सहज विकता येते. याशिवाय बँकेकडून होम लोन घेताना दिलेली कागदपत्र परत घेण्यास विसरू नका.
पर्सनल, क्रेडिट कार्ड आणि अन्य प्रकारची कर्ज
जर तुम्ही पर्सनल, क्रेडिट कार्ड आणि दुसर्या प्रकारचे कर्ज घेतले आहे तर अशा प्रकारच्या कर्जात क्लोजर पत्र (एनडीसी) मिळाल्यानंतर कर्ज संपल्याचे मानले जाते. कर्ज घेतल्यानंतर क्रडिट स्कोर तपासला पाहिजे. पण, हे काही बंधनकारक नाही. कर्ज चुकवल्यानंतर बँक सिबिल स्कोर मागू शकता. बँक यासाठी 30 दिवसांची वेळ देते. जेव्हा, बँक ही माहिती देईल की, तुमचा सिबिल स्कोर अपडेट केला आहे, तेव्हा सिबिलद्वारे तुमचा अपडेटेड स्कोर प्राप्त करू शकता.