‘ऋषी कपूर-इरफान खान’नंतर आता ‘क्राईम पेट्रोल’मधील अभिनेत्याचं कॅन्सरमुळं निधन, वर्गणीच्या पैशांतून सुरू होते उपचार, कहाणी वाचून येईल डोळ्यात पाणी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील दोन महान कलाकार ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला. दोघांचंही निधन कॅन्सरनं झालं होतं. यानंतर आता आणखी एका अभिनेत्याचं कॅन्सरमुळं निधन झालं आहे. क्राईम पेट्रोलमधील या अॅक्टरचं नाव आहे शफीक अन्सारी. शफीक यांनी क्राईम पेट्रोल या मालिकेत अनेक भूमिका साकारल्या आहेत. दीर्घकाळापासून ते कॅन्सरसोबत झुंज देत होते.

शफीन अन्सारही यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते. आजारामुळं त्यांना दीर्घकाळापासून अभिनयदेखील करता येत नव्हता. त्यांनी आर्थिक स्थिती तंगीची होती. शफीक यांच्या मित्रानं फेसबुकवर त्यांच्या नावानं पेज बनवून लोकांकडे मदत मागितली होती. कुटुंबात कमावणारे ते एकमेव होते. कुटुंबात त्यांच्यानंतर तीन मुली आणि पत्नी आहे. वर्गणीतून जमा झालेल्या पैशांमधून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

शफीक अन्सारी यांच्या फेसबुक पेजवरून त्यांच्या उपचारादरम्यानचे अनेक फोटो समोर आले आहेत. यात ते खूपच कमजोर दिसत होते. त्यांना आपल्या मुलींचीही चिंता होती.

शफीक यांनी क्राईम पेट्रोल व्यतिरीक्त इतरही अनेक मालिकेत काम केलं आहे. गेल्या 12 दिवसांत कॅन्सरमुळं झालेला हा बॉलिवूडमधील तिसरा मृत्यू आहे.