रशियानंतर ‘या’ देशानं दिली ‘कोरोना’विरूध्दच्या वॅक्सीनला मान्यता, जगाला मिळाली आणखी एक Corona Vaccine

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत २२,०६७,२८० जणांना याची लागण झाली आहे. तर ७७७, ६७५ लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. अशातच रशियाने कोरोना संसर्गावरील लशीला मान्यता दिली असतानाच, चीनने देखील लस तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे. चिनी लस कंपनी कॅन्सायनो बायोलॉजिक्स कॉर्पोरेशन यांना कोरोना लस Ad5-nCOV च्या पेटंटसाठी मान्यता मिळाली आहे. पण रशियाच्या लशीप्रमाणे हिची सुद्धा तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण न करता या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.

चीनमधील वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये जर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढू लागला तर या लशीचे उत्पादन सुरु करण्यात येईल, असा दावा कंपनीने केला आहे. पेटंटने या लशीच्या सुरक्षिततेची आणि प्रभावीपणाची हमी दिली असून, मर्यादित वापरासाठी ही लस मंजूर केल्याचं चीनने सांगितलं आहे. जूनमध्ये चिनी सैन्य दलातील जवानांसाठी CanSino बायोलॉजिक्सच्या लशीला मंजुरी देण्यात आलेली. चीनच्या इंटलेक्चुअर प्रॉपर्टी अंतर्गत CanSino ११ ऑगस्ट रोजी या लशीच्या पेटंटला मान्यता दिलेली.

… म्हणून दिली पेटंटला मान्यता

चीनच्या सरकारी वृत्तपत्रानुसार, ११ ऑगस्ट रोजी इंटलेक्चुअर प्रॉपर्टीच्या मार्फत लशीला परवानगी देण्यात आली होती. त्याच दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन लस Sputnik-V ची घोषणा केली. रशिया, ब्राझील आणि सौदी अरेबिया मध्ये CanSino तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु करतील. यासाठी सौदी अरेबियात पाच हजारांहून अधिक वॉलेंटिअर तयार आहेत.

Ad5-nCOV असे आहे लशीचे नाव

अकॅडमी ऑफ मिलटरी मेडिकल सायन्सच्या मदतीने CanSino ने ही लस तयार केली आहे. तिचे नाव Ad5-nCOV ठेवलं आहे. सामान्य सर्दी-खोकल्याच्या संसर्गात बदल करुन नोवल कोरोना व्हायरसची जेनेरिक मटेरियल यामध्ये जोडलं आहे. वॉल्टर आणि एलिझा हॉल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रोफेसर मार्क पेलेग्रीनी यांनी म्हटलं की, “या पेटंटमुळे आता या लशीची कॉपी कोणी करु शकणार नाही. पण क्लिनिकल चाचण्या पुढे जाण्यासाठी पेटंटची गरज नाही.” तर या महिन्यात सौदी अरेबियाने सांगितले होते की, CanSino च्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात येईल.