सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणलाही ‘कोरोना’ची बाधा

पोलीसनामा ऑनलाईन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता भारतीय संघातील माजी खेळाडू युसूफ पठाणलाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. स्वतः युसूफने शनिवारी (दि. 27) रात्री साडेआठ वाजता ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंतीही त्याने ट्विटद्वारे केली आहे.

 

 

 

सचिन तेंडुलकरला शनिवारी दुपारी कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर रात्री युसूफने त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षण आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली असल्याचे यूसूफने म्हटले आहे. दरम्यान सचिनने कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विट करून माहिती दिली होती. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनाचे पालन करत असल्याचे सचिनने म्हटले आहे.