छत्रपती खा. संभाजी राजे भोसलेंचे ‘उपोषण’ मागे, ‘सारथी’ची ‘स्वायत्तता’ कायम राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात खासदार संभाजी राजे भोसलेंनी आज सारथी संस्था वाचवण्याठी उपोषण केले. त्यामुळे सरकार याबाबात काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर संभाजी राजेंनी उपोषणकर्त्यांना संबोधित करताना आपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोन झाला. चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी सांगितले की कोणत्याही परिस्थिती सारथीची स्वायत्तता कमी होणार नाही.

संभाजी राजे भोसले म्हणाले की शाहू महाराज्यांचा विचार घेऊन आपण पुढे जाणार आहोत. राष्ट्रपती राजवट लागू असताना संस्था संपवण्याचा डाव सुरु होता. सारथीची स्वायतता कायम राहावी. एकनाथ शिंदेंनी उपोषणाला भेट दिली, बरं वाटलं. उद्धव ठाकरेंचा मला फोन झाला. ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत सारथीची स्वायत्तता कमी होणार नाही.

या उपोषणाला मराठा विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सारथी संस्था वाचवावी म्हणून संभाजी राजे उपोषणाला बसले होते. यावेळी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि त्यांनी आम्ही तुमचं ऐकून घेतलं आहे आणि सरकारचा निर्णय देखील तुमच्या बाजूने आहे. सारथीची स्वायत्तता कमी होणार नाही असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने खासार संभाजी राजे भोसले यांना पुण्यात सुरु असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी, मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेंनी उपोषणाला बसू नका अशी विनंती केली होती. परंतु ते म्हणाले की सामान्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी मला रात्री फोनवरुन सांगितले की संभाजीराजे सारथी प्रश्नी उपोषणाला बसणार आहोत.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की जे पी गुप्ता यांना आपण तात्काळ बाजूला करत आहोत, आता त्यांचा कोणताही हस्तक्षेप या संस्थेत होणार नाही. त्यांनी काढलेले सर्व जीआर रद्दबातल करण्यात आले आहेत. जे पी गुप्ता ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव आहेत. तसेच एकनाथ शिंदेंनी सांगितले की मराठा आंदोलकांवरील गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/