त्या ‘सेम टू सेम’ कॅप्शनच्या चर्चेला सोशलवर ‘उत’, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा अन् शुभमन गिल झाले ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसने राज्यात धुमाकुळ घातला असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मोठ्या लॉकडाऊनमध्ये क्रिकेटपटूपासून अन्य स्टार सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाले. सिने कलाकार असोत किंवा क्रिकेटपटू नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या सोशल मिडिया पोस्टवर सर्वांची नजर असते. अशातच भारतीय संघातील क्रिकेटपटू शुभमन गिल आणि माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. अर्थात ही काही खास गोष्ट नाही. सेलिब्रिटी किंवा क्रिकेटपटू त्याचे असे अनेक फोटो शेअर करत असतात. पण या दोघांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक साम्य होते. हे साम्य म्हणजे फोटोच्या खालील लिहलेले कॅप्शन.

View this post on Instagram

I spy 👀

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

सारा आणि शुभमन यांनी आपल्या फोटो खाली दोन डोळ्यांच्या इमोजीसह i spy असे लिहले आहे. या दोघांनी एकाच दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी फोटो शेअर केले आहेत. शुभमन याने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तो सनग्लासेस पांढरा शर्ट, त्यावर जॅकेट आणि निळी जिन्समध्ये एका बेंचवर बसला आहे. तर साराने इस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहे. या दोघांनी एकच कॅप्शन i spy अशी दिली आहे.
सारा आणि शुभमन या दोघांच्या कॅप्शनमध्ये समानता दिसल्यानंतर युझर्सनी लगेच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर फक्त क्रिकेटपटू शुभमन गिलला ट्रोल केले जात होते. पण त्यानंतर सारा तेंडुलकरशी संबंधित प्रतिक्रिया सुरु झाल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like