सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सैफ अली खानने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सारानंतर आता त्याचा मुलगा इब्राहिमदेखील आपल्या वडीलांच्या पावलांवर पाउल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे.

सैफने स्वतः या वृत्ताला दुजोरा देत आपल्या मुलाचे स्वागत केले आहे. सैफच्या नुसार, त्याची नेहमीच इच्छा होती की त्याचा मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी. त्याची सारा आणि इब्राहिम या दोघांनी अभिनय क्षेत्रात काम करावे ही इच्छा होती. बऱ्याच काळापासून ही चर्चा होती की इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण तेव्हा अधिकृत माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे ही अफवा मानली जात होती. मात्र आता सैफला वाटते की त्याचा मुलगा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. आता अभिनय करण्यासाठी फिट आहे. स्पॉटबॉयचा रिपोर्ट आहे.

इब्राहिम अली खानला आपले आजोबा मंसूर अली खान पटौदी यांच्यासारखा क्रिकेटची आवड आहे. या खेळात इब्राहिम तरबेज असल्याचे म्हटले जाते. मात्र जेव्हा इब्राहिमला क्रिकेट आणि एक्टिंग यापैकी एका क्षेत्राची निवड करायला सांगितली. तेव्हा त्याने एक्टिंग क्षेत्राची निवड केली. आता तो कोणत्या चित्रपटातून पदार्पण करतो, हे पाहणे कमालीचे ठरेल.