प्रेमसंबंधात ‘त्या’ फोटोमुळे ‘वितुष्ट’, ‘त्यानं’ चक्क प्रेयसीचा दाबला ‘गळा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या तीन वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध निर्माण केले होते. शुक्रवारी त्याने तिच्या मोबाईलवर इतर मुलांचे फोटो पाहून तिला मारहाण करुन गळा दाबून तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गजानन शामराव सूर्यवंशी (वय २३, रा. भोकर, नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रावेत येथे राहणाऱ्या १९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत आहेत. ही तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सूर्यवंशी याने या तरुणीला ती अल्पवयीन असताना २०१७ मध्ये लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेला.

तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याने या तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता. शुक्रवारी त्याने तिला हिंजवडी वाकड पुलाजवळील एका हॉटेलमध्ये नेले होते. तेथे तिच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या मोबाईलवर इतर मुलांचे फोटो पाहून त्याने तिला तू इतर मुलांशी का बोलतेस असे म्हणून तिच्या पोटात, डोक्यात, हाताने लाथाबुक्याने मारहण केली.

तिचा गळा दाबून या तरुणीला बेशुद्ध करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ती बेशुद्ध पडली असताना तिला तसेच रुमवर सोडून दिले. तिचा मोबाईल व गाडी तो घेऊन गेला. मोबाईलवरील वाट्सअ‍ॅप वरुन तिच्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ग्रुप व इतर सोशल मिडियावर तिचे अश्लिल व्हिडिओ व फोटो शेअर केले. तुला जे करायचे आहे ते कर अशी तिला धमकी दिली आहे. या तरुणीच्या फिर्यादीवरुन हिंजवडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, अपहरण, आय टी अ‍ॅक्टसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like