तब्बल सात तासा नंतर डॉक्टरांनी बसविला अंगठा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई मधील सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांनी एका ९ महिन्याच्या चिमुकल्याची सर्जरी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्या चिमुकल्याच्या हाताला चार नसून तब्बल साडेसात बोटे होती. त्याच्या हातावर असलेले अधिक साडेतीन बोटे काढून तेथे आंगठा लावण्यात डॉक्टरांना यश प्राप्त झाले आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e235acb-964e-11e8-adf5-c9d2ed4a4eb5′]

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश मधील रहिवाशी असलेल्या  एका परिवारातील एका चिमुकल्याला चार बोटे नसून तब्बल साडेसात बोटे होती, त्यावर उपचार घेण्यासाठी तो परिवार मुंबई मधील सेंट जॉर्ज रुग्णालयात आले असता, या उपचारादरम्यान त्याच्या हातावरील साडेतीन बोटे काढून त्याजागेवर अंगठा बसविण्यात आला.

विशेष म्हणजे रुग्णालयाने या सर्जरी साठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले नाही. याबाबत या सर्जरीचे मुख्य डॉक्टर रजत कपूर हे बोलत असताना म्हंटले की, याला मिरर हॅन्ड असे म्हणतात, एका हातावर आणखी जास्त बोटे असने हे काही नवीन नाही मात्र सात बोटे हे खूप कमी वेळा पाहायला मिळतात. आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत मी हि पहिली घटना पहिली आहे,  ही सर्जरी खूप अवघड होती, तब्बल साडेसात तासाच्या या सर्जरी नंतर साडेतीन बोटे काढून तेथे आंगठा बसवण्यात आला.

मिरर हॅन्ड मध्ये व्यक्तीच्या हातात अंगठा नसून सात आठ बोटे असतात. यात असलेली बोटे काम करत नाहीत, याचबरोबर जास्त काम केल्यावर हातही दुखू लागतो.

तसेच अश्या अधिक असलेल्या बोटांमुळे सर्व बोटे काम करत नाहीत, त्यामुळे सर्जरी करून त्यांना वेगळे करणे गरजेचे असते. आणि त्याच बरोबर आंगठा नसेल तर बऱ्याच गोष्टीं मध्ये अडथळा निर्माण होतो. जसे की, वस्तू उचलणे, लिहिणे अश्या अनेक गोष्टींचा विचार घेत अधिक असलेली बोटे काढून तिथे अंगठा बसविण्यात आला.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44335386-964e-11e8-9ac5-a5070bb77171′]

यासंदर्भात विशेष म्हणजे सिने अभिनेता ह्रितिक रोशन याला एक तर अभिनेत्री जेम्मा आर्टरटन ह्यांना दोन अधिक बोटे होती. याच बरोबर वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू सर गारफिल्डस सोबर्स याच्या दोन्ही हातांना अधिक बोटे होती मात्र त्यानेही सर्जरी मार्फत ती बोटे काढली, याच प्रकारे टेनिस प्लेयर मारिया शारापोवा यांच्या पायातही १२ बोटे होती.