सेक्स केल्यानंतर वहिनीची हत्या केली , आरोपीने दिली कबुली

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईतील अक्सा बीचवरील कॉटेज मागील आठवड्यात एका तरुणीचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळला होता. खून करून पलायन करणारा आरोपी गुजरात मध्ये पकडण्यात आला असून , खून करण्यापूर्वी आरोपीला झटापटीत झालेल्या गंभीर जखमेमुळे त्याला दवाखान्यात दाखल केले आहे. त्याला उपचारानंतर अटक केले जाणार आहे. आरोपीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, वहिनीशी सेक्स केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणात आरोपी हरीश तातड (वय ३०) हा गुजरात मधील सुरत येथे पोलिसांच्या निगराणी खाली असून त्याच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला अटक केली जाणार आहे. मागच्या आठवड्यात मयत इंदू तातड (वय ३३) हिचा अक्सा बीचवरील कॉटेजमध्ये नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

असे घडले हत्याकांड
आरोपी हरीश आणि इंदू दोघेही नातेवाईक असून इंदू हरीशच्या चुलत भावाची बायको आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासूनअनैतिक संबंध होते. इंदूचे हरीश शिवाय अन्य पुरुषांबरोबरही अनैतिक संबंध होते. इंदूचे अन्य पुरुषांबरोबर केलेल्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ हरीशने पाहिले होते. बीचवरील कॉटेज येथे दोघांनी सेक्स केला ,यानंतर हरीश वॉशरुममध्ये गेला. तो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले कि, इंदूने तिच्या बॅगमधून चाकू काढला होता. हरीशला आपल्या बाहेर असलेल्या अनैतिक संबंधांबद्दल कळल्याचे इंदूच्या लक्षात आले होते. हरीशने तिच्या नवऱ्याला याबद्दलची माहिती देऊ नये म्हणून चाकू काढून ती त्याला धमकावत होती. दोघांमध्ये वादावादी सुरु असताना इंदूने हरीशवर हल्ला केला. यामध्ये हरीशच्या पोटात आणि मांडीवर जखमा झाल्या झटपट सुरु असताना हरीशने तिच्याकडील चाकू हिसकावत तिच्यावर अनेक वार केले त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर तेथून बाहेर पडून हरीशने गुजरातला जाणारी बस पकडली.

प्रवासादरम्यान हरीश जखमी असल्याचे वाहकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने नवसारी येथे बस थांबवली आणि आपातकालीन सेवेला बोलावले. नवसारी पोलीस तिथे पोहोचले तेव्हा हरीशने त्यांना हत्येची कबुली दिली. जखमा गंभीर असल्याने रक्तस्राव होत होता , त्यामुळे हरीशला दवाखान्यात नेण्यात आले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सूरतला गेले असून उपचार पूर्ण झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात येणार असल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले.