शाहरुख पाठोपाठ आता रितेशही ZERO 

मुंबई  :  वृत्तसंस्था – शाहरुख खान हा त्याच्या येणाऱ्या ‘झिरो’ चित्रपटात बुटक्या माणसाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. आता शाहरुख पाठोपाठ रितेश ही बुटक्या माणसाची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.  ‘मरजांवा’ या चित्रपटात रितेश देशमुख बुटक्या व्यक्तिच्याभूमिकेत दिसणार  आहे.
या आधी कमल हसन हे ( १९८९) ‘अप्पू राजा’ या चित्रपटात बुटक्या माणसाची भूमिका साकारून कौतुकास पात्र ठरले होते .या नंतर २००६ साली अनुपम खेर हे ‘जाने मन’  या चित्रपटात बुटक्याच्या भूमिकेत दिसले. आता  दिग्दर्शक मिलाप जवेरी यांच्या ‘मरजांवा’ या चित्रपटात रितेश देशमुख बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘मरजांवा’ प्रेमत्रिकोण असलेली एक रोमॅन्टिक कथा आहे.या चित्रपटात रितेश बरोबर सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रितेश आणि सिद्धार्थ ने याआधी ‘एक व्हिलन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.   मरजांवा या चित्रपटाचे निखिल आडवाणी हे  प्रोड्युसरअसून हा चित्रपट पुढच्या वर्षी २ आॅक्टोबरला रिलीज होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us