शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (दि.31 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आज थेट एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. जळगावातील मुक्ताईनगर येथे असलेल्या एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी फडणवीस गेले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच खडसे यांच्या घरी गेले. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील होते.

कोरोना काळात जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर आवश्य ‘या’ Tips फॉलो करा, जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस यांनी कालच शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ते आज थेट जळगावात रक्षा खडसेंच्या भेटीसाठी पोहचले आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस आणि महाजन हे पहिल्यांदाच जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आले आहेत. फडणवीसांनी यावेळी मुक्ताईनगर मधील ग्रामीण रुग्णालयाची देखील पाहणी केली. तसेच वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत.

‘या’ 6 गोष्टी मेहंदीमध्ये मिसळल्या जातात

जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या पक्ष बांधणीसंदर्भात फडणवीस हे रक्षा खडसे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या आजी-माजी दहा नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि रक्षा खडसे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

READ ALSO THIS :

Sanjay Raut : ‘शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र सांगितला असेल’

यंदाच्या उन्हाळ्यात दूध केवळ पिऊ नका तर चेहर्‍यावर देखील लावा, स्किन होईल ग्लो; जाणून घ्या

Manish Sisodia : ‘केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरतंय त्याच्या 1 % जरी कोरोनाविरुध्दच्या लढाईत वापरले असतं,तर…’

घरबसल्या ‘या’ पध्दतीनं करा बॉडी पॉलिशिंग, पार्लर सारखा ग्लो मिळेल, जाणून घ्या

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर