‘शिवशाही’ नंतर आता ‘शयनयान’ लवकरच प्रवाशांच्या भेटीला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एस टी महामंडळातील वातानुकूलित ‘शिवशाही’ नंतर आता खास प्रवाशांसाठी बहुप्रतीक्षित वीनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) ‘शयनयान ‘ एस टी लवकरच प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. ‘शयनयान’ची बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे. पुणे यथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीनंतर ही एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
[amazon_link asins=’B00WJI7MR0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’231c38f8-8442-11e8-bc28-d9a3443f2161′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाही आणि वीनावातानुकूलित शयनयान या दोन एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शिवशाही आता सुरु आहे. तर महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळेत वीणावातानुकूलित शयनयान एसटीची बांधणी पूर्ण करण्यात आली.

सध्या तयार करण्यात आलेली शयनयान  ही एस टी महामंडळाची प्रोटोटाइप म्हणून बांधण्यात आली आहे. पुण्यातील सीआयआरटी ने प्रमाणित केल्यानंतर तब्ब्ल एक हजार बसेसची बांधणी करण्यात येईल. २ बाय १ अशा प्रकारची ३० आसने या एसटी मध्ये असणार आहेत. ही एसटी आंतरराज्य मार्गावर रातराणीच्या जागेवर धावेल.
[amazon_link asins=’B0722R5XHW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28a35261-8442-11e8-abd1-cfead0ea47e8′]

रात्री प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा, म्हणून महामंडळाने विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय घेतला होता. रातराणीच्या सध्या ६०० बस राज्यभर धावत आहेत. रातराणीच्या तिकीट दरांमध्ये विनावातानुकूलित शयनयान प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.