सहा महिन्यानंतर घरफोडीतील आरोपी जेरबंद; १.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

दोन संशयीतांकडे सोन्याचे दागिने असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडले आहे. या दोघांकडे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दागिने असल्याचे आढळून आले. वान्लेसवाडीतील वकिल कॉलनीत सहा महिन्यांपूर्वी घरफोडी झाली होती. यातील हे दोन आरोपी आहेत. या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

[amazon_link asins=’B009WNA9V6,B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16b7b645-ad99-11e8-ae82-15ef60ed4304′]

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश चंद्रकांत मुळे (२७, बुधवार पेठ, कोल्हापूर) व सत्यजीत जितेंद्र वायदंडे (२३, रा. भावे कॉलनी, मिरज) अशी आहेत. त्यांच्याकडून १ लाख ७१ हजार रूपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अधिक माहिती अशी, की घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विश्रामबागसह मिरज शहरात एलसीबीचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी कृपामाई हॉस्पिटलजवळ दोघांकडे चोरीचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश मुळे आणि सत्यजित वायदंडे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता दोघांकडेही सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत विचारणा केली असता दोघांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी वान्लेसवाडीतील वकिल कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, राजु कदम, युवराज पाटील, मारूती साळुंखे, अमित परीट, संदीप पाटील, सतीश अलदर, विकास भोसले, शशिकांत जाधव यांनी कारवाई केली.

पुणे : दहीहंडी फ्लेक्स लावण्यावरून तरुणाचा खून