पुणे : समलिंगी तरुणांमधील वादात कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

समलैंगिक संबंध आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अशाच एका प्रकरणात पषाण-सुस रस्त्यावरील २३ वर्षीय युवकाने शुक्रवार पेठमधील त्याच्या झोपेत असलेल्या पार्टनरवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ४६ वर्षीय जखमी व्यक्तीने खडक पोलिस ठाण्यात तरुणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. समलैंगिक संबंधामधील हा पहिलाच गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. खडक पोलिसांनी युकाला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B077B3MXKW,B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43429bba-bcf8-11e8-a761-25bd5cd5599f’]

समलैंगिक मित्राकडून रोणाऱ्या शारिरीक सुखाच्या मागणीला वैतागून त्याच्या दुसऱ्या समलैंगिक मित्राकडून कोयत्याने वार करण्यात आले असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुण्यात वाहनांचे शोरुम आहे. त्यांचा 20 वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र नंतर पत्नीशी घटस्फोट झाला. तेव्हा पासून ते अविवाहीत आहेत. सुमारे अडीच वर्षापूर्वी फिर्यादींची हल्लेखोर तरुणाशी ओळख झाली होती. दोघेही समलैंगिक असल्याने ते अनेकदा एकत्र असायचे. हल्लेखोर तरुण हा  एका दुसर्‍या तरुणासोबत राहत होता. दरम्यान, फिर्यादी व हल्लेखोर तरुण दोघेही मंगळवारी रात्री एकत्र झोपण्यास घरी होते. त्यानंतर झोपेत असलेल्या फिर्यादींवर त्याने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कोयत्याने हल्ला करत डोक्यावर, उजव्या खांद्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
[amazon_link asins=’B078124279,B01MQYSR0P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’498b0982-bcf8-11e8-bf6c-2f9cf6a465c2′]

हल्ला करणाऱ्या युवकाकडे फिर्यादी सारखा शारिरीक सुखाची मागणी करत होता. यामुळे वैतागलेल्या युवकाने हे कृत्या केले असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाजी राठोड करत आहेत.