सुषमा स्वराज, जेटलींच्‍यानंतर मोदींचा नंबर, ब्रिटिश खासदाराचे ‘वादग्रस्त’ ट्विट

लंडन : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वादग्रस्त ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्‍वराज, मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री बाबूलाल गौर, गोव्‍याचे माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर या सर्वांचा एका वर्षाच्‍या आत मृत्‍यू झाला. आता नरेंद्र मोदी यांचा नंबर असे ट्विट ब्रिटिश खासदार लॉर्ड नजीर अहमद यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटले आहे. भाजपा खासदार प्रज्ञा सिंह यांच्या काळ्या जादूच्या विधानावर टिप्पणी करताना त्यांनी हे ट्विट केले आहे. यामुळे सोशल मीडियावरचे वातावरण गरम झाले आहे. केवळ भारतातीलच नव्हे जगभरातील नेटकऱ्यांनी अहमद यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

https://twitter.com/nazir_lord/status/1165925619194048513

अहमद यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटले आहे की, भाजपच्‍या एका नेत्‍याने दावा केला आहे की, काळ्या जादूमुळे भाजपमधील नेत्‍यांचे मृत्‍यू होत आहेत. या दाव्‍यात म्‍हटले आहे की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गेल्या एका वर्षाच्या आत निधन झाले. आता पुढचा नंबर नरेंद्र मोदी यांचा आहे.’

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. ‘लोकांना मॅनेज करून तुम्ही हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य झाला आहात का? अशा प्रकारच्या ब्रिटीश बुद्धिजीवी वर्गाकडे पाहिलं की या भूमीवर कसल्‍या कसल्‍या प्रकारचे लोक जन्‍माला येत आहेत, हे माझ्‍या समजण्‍याच्‍या पलीकडे आहे.’ अशी खोचक टीका रिजिजू यांनी केली आहे.

लॉर्ड नझीर अहमद हे ब्रिटीश संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्डचे आजीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले पहिले मुस्लिमधर्मीय नेते आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –