अजय देवगण म्हणतोय ‘दे दे प्यार दे’

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २०१७ मध्‍येच अभिनेता अजय देवगनने  चित्रपट ‘तानाजी’ ची घोषणा केली होती त्यासोबत एक पोस्टरदेखील रिलीज केलं होतं. यानंतर त्याने नुकताच याच्या तानाजी या चित्रपटाचा पहिला लुक रिलीज केला. हा लुक रिलीज करत अजयने देवगनने नववर्षाच्‍या सुरुवातीलाच आपल्‍या चाहत्‍यांना एक ग्रेट गिफ्‍ट दिल.

आता ‘तानाजी’नंतर ‘दे दे प्यार दे’चा फर्स्ट लुक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असताना दिसत आहे. नव्या वर्षाची सुरूवात होताच बॉलिवूडमध्ये आगामी चित्रपटाचे फर्स्ट लुक धुमाकूळ घालत आहे. यात अभिनेता अजय देवगन यांच्या दोन सिनेमाचे फर्स्ट लुक व्हायरल झाले आहेत.

नवीन वर्ष सुरू झालं ना झालं तेच आगामी वर्षभरात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या सिनेमाची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात अभिनेता अजय देवगन आघाडीवर आहे. त्याच्या तानाजी सिनेमाचे पोस्टर बुधवारी सकाळी रिलीज झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातील अजयचा लुक प्रेक्षकाच्या पंसतीस उतरला आहे.

त्यानंतर सायंकाळी दे दे प्यार दे च्या आॅफिशियल पेजवर एक ट्विट करण्यात आले आहे. यात अजयचा जबरदस्त लुक दिसून येत असून, तो दे दे प्यार दे मधील असल्याचे समजते. अकीव अली दिग्दर्शित आणि लव रंजन व टी सीरिजची निर्मिती असलेला हा सिनेमा १५ मार्च रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

आगामी दोन वर्षात अजयचे तानाजी आणि दे दे प्यार दे बरोबरच सन ऑफ सरदार २, चाणक्य, टोटल धमाल आणि पत्नी काजोलसोबतही एक सिनेमा झळकणार आहे. या सर्व सिनेमामध्ये अजय वेगवेगळ्या भूमिकात दिसणार आहे. प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता असल्याचे दिसत आहे.