तेलंगणानंतर आंध्र प्रदेशातही मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त ?

अमरावती (आंध्र प्रदेश) : पोलीसनामा ऑनलाईन 

मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव यांनी तेलंगणामधील विधानसभा मुदतीआधीच बरखास्त केल्यानंतर आता आंध्र प्रदेशातही विधानसभा बरखास्त करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरु झाल्या आहेत . पुढील वर्षात राज्य विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष मजबूती करणासाठी  तेलगू देसम पार्टीने  काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टीकडून काँग्रेसला व इतर मोठ्या पक्षांना  शह देण्याचा प्रयत्न सुरूआहे.

[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a0b2bd3-b268-11e8-b306-63f9708d99c4′]

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी नुकतीच विजयवाडा येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतल्याने दक्षिणेतील राजकीय समीकरणे  बदलू लागली आहेत . दक्षिणेत प्रादेशिक पक्ष मजबुतीसाठी तसेच ऐक्य वाढवण्याबाबत नायडू आणि कुमारस्वामी यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. काल  काँग्रेस नेते आणि माजी मंत्री कोंदरू मुरली मोहन यांनी टीडीपी पक्षात प्रवेश केला.  मोहन हे २००९ ते २०१४ दरम्यान आरोग्य मंत्री होते.

तेलंगणामध्ये आता निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. तेलगू भाषिक असलेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हा प्रदेश याआधी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर या भागात प्रादेशिक पक्ष प्रबळ होऊ लागले आहेत . दक्षिणेतील आंध्र प्रदेशसह तेलंगणा, कर्नाटक, केरळमध्ये प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आहे. दक्षिणेत काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पक्षांची कोंडी फोडून दक्षिणेत पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळे प्रादेशिक पक्ष सतर्क झाले असून ते आपला मजबूत करण्यासाठी धडपड करत आहेत.