‘आरे’ पाठोपाठ ठाण्यात मेट्रोसाठी झाडांची ‘रात्री’त कत्तल !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’मधील वृक्षतोड गाजली असताना व शिवसेनेचा त्याला विरोध होत असताना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना ठाणे मेट्रोसाठी रात्रीत झाडांची कत्तल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही बाब समोर आली आहे.

ठाण्यात पहाटे दोन वाजता झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचे समजल्यावर अविनाश जाधव हे तातडीने तेथे गेले. तोपर्यंत सहा ते सात झाडे मुळासकट तोडण्यात आली होती. पहाटे दोन वाजता अविनाश जाधव हे तेथे पोहचले व त्यांनी ही वृक्षतोड थांबविली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली.

ठाणे महापालिकेने कोणते ही झाड तोडायचे असेल तर त्याठिकाणी वन विभाग किंवा इतर अधिकारी उपस्थित असणे आवश्यक केले आहे. असे असताना यावेळी झाड तोड होत असताना त्या ठिकाणी वन विभाग किंवा इतर कोणी अधिकारी उपस्थित नव्हता, असे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com