युती नंतर शिवसेना-भाजपचा रिपाईवर अन्याय

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन शिवसेना – भाजपाने युतीची घोषणा केली. मात्र यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आणि विशेष म्हणजे आम्हाला एकही जागा सोडली नाही. शवसेना – भाजपने रिपाईवर अन्याय केला आहे. असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आज ( गुरुवारी )औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. दरम्यान, युतीच्या वाटाघाटीत दोघांच्याच जागा वाटपावर तोडगा निघाला आहे. आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत. असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकत्याबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवणार आहोत असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, शिवसेना – भाजपाने युतीची घोषणा केली. मात्र यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा करून आमच्यासाठी एक जागा सोडावी अशी मागणीही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, शवसेना – भाजपने रिपाईवर अन्याय केला आहे. असा आरोपही त्यांनी केला.