गर्भवती महिलेचा अ‍ॅटो रिक्षात मृत्यू झाल्यानंतर किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘आज मुंबईचं ‘पतन’ झालं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसशी झगडत असलेल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना घडली आहे. जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. इथल्या ठाण्यामध्ये 22 वर्षाच्या गर्भवती महिलेला अनेक रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही म्हणून तिचा रिक्षामध्ये मृत्यू झाला. गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही म्हणून मुब्रा पोलिसांनी तीन रुग्णालयावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 25 आणि 26 मे रोजी रात्री घडली. या घटनेनंतर भाजपचे नेता किरीट सोमय्या यांनी कोविडच्या खराब व्यवस्थापनेबद्दल महाराष्ट्र सरकरावर टीका केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय दुर्लक्ष होणे ही रोजची सवय झाली आहे. खासकरुन मुंबईमध्ये जिथे मेडिकल सर्विस पुर्णपणे खराब आहे. ते म्हणाले की, एका गर्भवती महिलेला कोणत्याच रुग्णालयात दाखल केले जात नाही आणि त्यामध्ये तिचा मृत्यू होतो. महाराष्ट्रामध्ये हे रोज होत आले आहे. जर मुंबईबद्दल बोलायचे म्हणले तर, येथील सगळे रुग्णालय हाऊस फुल आहे आणि येथे रुग्णवाहिका देखील उपलब्ध नाही. वैद्यकीय सुविधांच्या संदर्भात मुंबईची गती कमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आस्मा मेंहदी नावाची महिला गर्भवती होती तिला पोटात दुखायला लागले. त्यामुळे परिवाराच्या एका सदस्याबरोबर महिला एका मागे एक रुग्णायलयात गेली. ते सगळ्यात पहिले बिलाल रुग्णालयात गेले तेथे प्रवेश मिळाला नाही म्हणून ते प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात गेले आणि त्यानंतर यूनिवर्सल रुग्णालयात गेले. तिन्ही रुग्णालयाने तिला दाखल करुन घेण्यास नकार दिला. तिला हे सांगून दाखल केले नाही की, इथे फक्त कोरोनाच्या रुग्णांचा उपचार होतो. पोलिसांनी 28 मेला वैद्यकीय दुर्लक्ष केल्यामुळे बिलाल रुग्णालय आणि प्राइम केअर रुग्णालयावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like