चिमुरड्याच्या मृत्युनंतर स्कुल बस फोडली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 

स्कूल बसखाली चिरडून नर्सरीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरातील उमरेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी स्कुल बसवर दगडफेक करुन ती फोडली. गेल्या २४ तासात नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्याचा मृत्यु होण्याची ही दुसरी घटना आहे.

[amazon_link asins=’B077T4Y2B4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bcc8de3-8720-11e8-9b72-c1aeed0b71be’]

नागपूरमध्ये उमरेड तालुक्यातील अकोला भागात ‘वृंदावन कॉन्व्हेंट आणि ज्युनियर कॉलेज आपतुर’ शाळा आहे. शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या शिवम अमोल रार्घोते या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.

शुक्रवारी संध्याकाळी शिवम स्कूल बसने घरी येत होता. स्टॉपवर शिवम उतरला आहे की नाही, हे न पाहताच बस चालकाने घाईघाईने बस पुढे नेली. त्यामुळे शिवमचा तोल गेला आणि तो खाली पडला. दुर्दैवाने  बसच्याच मागच्या चाकाखाली तो चिरडला गेला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावातील नागरिकांनी स्कूल बस फोडली.