काय सांगता ! होय, कुत्र्यालाही लागण झाली ‘कोरोना’ची, एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव झाला असून आता पाळीव कुत्र्यांमध्येही व्हायरसचा शिरकाव झाला आहे. यामुळे हाँगकाँगमध्ये कोरोनाग्रस्त 17 वर्षाच्या पाळीव कुत्र्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर आता अजून दोन श्वानांना करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या श्वानाला त्याच्या मालकिणीकडून करोनाची लागण झाली होती.

दिवसेंदिवस कोरोना व्हायसचा विळखा आणखीनच घटट होत चालला आहे. मानवातून प्राण्यामध्ये व्हायरसचा प्रसार झाल्याने भीती व्यक्त केली जात आहे. 17 वर्षाच्या पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला कोरोनाच्या संशयावरुन आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले होते. तब्बल 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवल्यानंतर त्याला काही दिवसांपूर्वी सोडून देण्यात आले. मात्र, त्याची सूटका झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये संबंधित कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर येथे एका दोन वर्षाच्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानालाही कोरोनाची लागण झाली आहे. आता अजून एका पाळीव कुत्र्याला करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.