आईच्या निधनानंतर त्यानं दागिने अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी केले ‘दान’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – आईच्या निधनानंतर मुलाने आईचे दागिने अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी दान केले आहे. बीड येथील डॉक्टर अविनाश देशपांडे असं या दानशूर व्यक्तिचं नाव आहे. अविनाश यांच्या मातोश्रींचे चार दिवसांपूर्वी वार्धक्याने निधन झाले. आईचे राहिलेले सर्व सोन्याचे दागिने समाजाच्या उपेक्षितांच्या उपयोगी यावे, म्हणून त्यांनी ते दागिने पसायदान सेवा प्रकल्पासाठी दान दिले. ज्यातून अनाथ मुलाचा सांभाळ होतो.

अविनाश यांच्या आईकडे सोन्याचे जे दागिने होते ते दागिने त्यांनी आपल्या वापरात आणायचे नाहीत. उलट, एखाद्या विधायक कामासाठी उपयोगात आणायचे असा निर्णय देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबाने घेतला. त्यानुसार, आईचे राहिलेले सर्व दागिने डॉक्टर देशपांडे यांनी पसायदान सेवा प्रकल्पासाठी दान दिले. पसायदान सेवा प्रकल्प बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथे आहे. गोवर्धन दराडे हा प्रकल्प चालवतात. या ठिकाणी अनाथ मुलाचा सांभाळ केला जातो. तसेच त्यांचे शिक्षण अन् वसतिगृहाची व्यवस्था याच प्रकल्पातून सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like