ED कडून गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुख यांचा केंद्रावर निशाणा, म्हणाले – ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं’ (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनायलायनं गुन्हा दाखल केला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगी शिवाय चौकशी न करण्याचा निर्णय घेतला. तसेच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. या सर्व प्रकरणामुळे केंद्र सरकार नाराज झाल्याने त्यांनी माझी सीबीआय आणि ईडी कडून चौकशी सरु केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख पुढे म्हणाले, माझी ईडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळाली. मधल्या काळात सीबीआयच्या माध्यमातून माझी चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतूपोटी केले जात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केली.

 

 

 

 

म्हणून माझी चौकशी

मी गृहमंत्री असताना, सीबीआयला महाराष्ट्रात अनेक वर्षापासून कोणाचीही चौकशी करण्याची, तपास करण्याची जी मुभा होती. त्यावर ऑक्टोबर महिन्यात आम्ही निर्णय घेऊ शासनाच्या परवानगी शिवाय सीबीआय महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची चौकशी करता येणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला. तसेच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा प्रश्न विधानसभेत निघाला. त्यावेळी सर्व आमदारांच्या मागणीवरुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी एसआयटी नेमली. या सर्व प्रकरणामुळे बहुतेक केंद्र सरकार नाराज झाले असावे, त्यामुळे माझी सीबीआय आणि ईडी च्या माध्यमातून चौकशी होत आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

ईडीला चौकशीसाठी सहकार्य करणार

अनिल देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, ‘सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही’ त्यामुळे मी ज्या पद्धतीने सीबीआयला सहकार्य केले तसे ईडीला देखील चौकशीमध्ये सहकार्य करेन, असेही अनिल देशमुख यांनी सांगतले.