भारिप बहुजन वंचित आघाडीत विलीन करणार ; काय असेल पुढील रणनीती ?

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीनंतर भारिप-बहूजन महासंघ वंचित बहूजन आघाडीत विलीन करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. पुढच्या सर्व निवडणुका वंचित बहूजन आघाडीच्या झेंड्याखाली लढणार, अशीही घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. आज (दि.१४ मार्च) ला अकोला येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घेतला.

भाजपवर टीका केल्यावर भाजप आणि आरएसएसचे ब्लॅकमेलींगचे राजकारण सुर आहे. त्यामुळे आमची आघाडी होऊ नये यासाठी आरआरएस, भाजपने प्रयत्न केलेले आहेत. सध्या देशात दबावतंत्राचे राजकरण सुरू आहे. आणि हे राजकारण खूप घृणास्पद आहे. नात्या गोत्यातल्या माणसांना आता सत्तेत बसविल्या जात आहे. तसंच नाना पटोलेंची नागपूरातील उमेदवारी डमी आहे. अशीही टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षांची युती होऊ नये असंच भाजपचे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. तर राजकारण हे फक्त नात्यागोत्यातील मानसांना खुश करणं, सत्तेवर बसणं यासाठीच हे सगळं सुरु असल्याचं मतं प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबत पुढे जाणे शक्य नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होते. तसंच आम्ही २२ उमेदवार मागे घेऊ शकत नाही. १५ तारखेला संपूर्ण ४८ जागांचे उमेदवार जाहीर करु, असंही आंबेडकरांनी यावेळी जाहीर केलं. तसंच, प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभा लढवणार आहेत. त्यामुळे तेथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेंचा विरोधात प्रकाश आंबेडकर अशी लढत पहायला मिळणार आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

‘ मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात , उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार ‘

पुणे : गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली दिसली भाजप, शिवसेना आणि रिपाइं नगरसेवकांची एकजूट

नुसत्या चर्चाच रंगतायत ; निर्णय आला नाही , तर आम्ही आमचा निर्णय घेऊ

पबजी (PUBG) खेळणाऱ्या १० जणांना अटक परीक्षेच्या काळात पबजी खेळायला केली बंदी

राहुल गांधी नांदेड मधून लढणार, फुस्की ठरली बातमी ? त्या बहाद्दराचा दावा खोटा !