Coronavirus : पुण्याच्या ग्रामीण परिसरातही ‘कोरोना’ची एन्ट्री, 3 किमीचा परिसर ‘सील’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शहरात असणाऱ्या झोपडपट्या आणि एकमेकांना दाटीवाटीने चिटकून असणारी घरे यामुळे मोठ्या संख्येने पुणे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे . यातच पुण्याचा ग्रामीण भाग यापासून काहीअंशी लांब होता पण आता पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन परिसरामध्ये कोरोना पॉजिटीव्ह महिला आढळली .

इंदापूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारीचे उपाय सुरू केले असून भिगवण स्टेशन परिसरातील तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.दरम्यान, पुण्यात मंगळवारी २४ तासात तब्बल १२२ कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या १३३९ वर जाऊन पोहोचली आहे, तर जिल्ह्यात हीच आकडेवारी १४९१ वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात आणखी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा ७९ तर जिल्ह्यातली मृतांची संख्या ८३ वर गेला आहे.

एकंदरीतच पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या हि चिंतेची बाब बनत चालली आहे.