ऐतिहासीक विजयानंतर नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर ; घेणार ‘यांचे’ आशीर्वाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवाखाली सलग दुसऱ्यांदा एनडीएने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर मोदी उद्या दिनांक २६ मे रोजी ‘ होम पीच ‘असलेल्या गुजरात राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते आईचा आशीर्वाद घेणार आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर सोमवारी मी वाराणसीत असणार आहे. काशी ही महान भूमी आहे. येथील जनतेनं पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी जाणार आहे.’ दरम्यान गुजरात लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व २६ जागा जिंकल्या आहेत. गुजरात मधील जनतेने मोदींना पूर्ण पाठिंबा दिल्याचं लोकसभा निवडणुकीतून दिसलं आहे. त्यामुळं उद्याच्या गुजरात दौऱ्यात मोदी काय बोलतात, याची उत्सुकता आहे.