आशियाई स्पर्धेत कबड्डी नंतर आता खो -खो चा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

खो -खो ला आशियाई स्पर्धेचे दरवाजे उघडले. खोखो हा खेळ आशियाई स्पर्धेत खेळला जाणार का, याविषयी गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती. सध्या इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान खोखो या खेळाचे सादरीकरण करण्यात आले आणि हा खेळ पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खोखो संघटनेचे सचिव चंद्रजीत जाधव यांनी दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश होऊन आता बरीच वर्षे लोटली, पण महाराष्ट्रात तशीत परंपरा लाभलेला खोखो हा खेळ आशियाई स्पर्धेत खेळला जाणार का, याविषयी गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती. या वृत्ताने आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
[amazon_link asins=’B01KSXQNLS,B01N6OOW52′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’197064c6-a521-11e8-8183-37075cf206ba’]
यावेळी राष्ट्रीय खोखो संघटनेने खर्च करून या खेळाचे ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरणाची जबाबदारी उचलली होती. राष्ट्रीय खोखोचे अध्यक्ष सुधांशू मित्तल तसेच खोखोचे माजी पदाधिकारी व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांच्या प्रयत्नाने या खेळाची माहिती, हा खेळ खेळणाऱ्या देशांचा प्रतिसाद या गोष्टी लक्षात घेता त्याला आशियाई स्पर्धेत समाविष्ट करता येईल, अशी ग्वाही देण्यात आली, असेही जाधव म्हणाले.