परळीत पंकजा मुंडेंना स्टेजवरच आली ‘भोवळ’

परळी, पोलीसनामा ऑनलाइन – परळी येथील शेवटची प्रचार सभा सुरु असताना अचानक महिला आणि बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना चक्कर आली आणि त्या स्टेजवरच कोसळल्या. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पंकजा मुंडे यांनी यावेळी भावनिक भाषण केले आणि त्यानंतर अचानक चक्कर येऊन त्या कोसळल्या.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला अनेक जण त्यांना वारा घालू लागले. पंकजा मुंडे यांची प्रकृती सकाळपासूनच ठीक नव्हती तरीही त्या शेवटच्या सभेला हजार राहिल्या. आज एकूण त्यांनी तीन प्रचारसभा केल्या त्यातच परळीमधील शेवटची सभा सुरु असताना हा प्रकार घडला.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचार तोफा देखील आता धंडावलेल्या आहेत. परळीमधून पंकजा मुंडे यांच्या समोर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचं आव्हान आहे.