मोदींच्या अडचणीत वाढ, राफेलच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाने घेतली ‘त्या’ वक्तव्याची दखल

महाराष्ट्र निर्वाचन आयोगाकडून मागवला रिपोर्ट

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) – औसा येथे झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीवनातील आपलं पहिलं ऐतिहासिक मत आपण पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का ? तुमचं पहिलं मतदान पुलवामामध्ये जे वीर शहीद झाले, त्या शहिदांना पहिलं मतदान समर्पित होईल का ? असे वक्तव्य केले होते. मोदींना हे वक्तव्य महागात पडण्याची शक्यता आहे. मोदींनी केलेल्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला रिपोर्ट करायला सांगितले आहे.

नवमतदारांनो, तुम्ही तुमचे पहिले मत हे देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून केले आहे. मोदींच्या या आवाहनाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस आणि माकपने ही तक्रार दाखल केली असून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने मोदींनी मताची मागणी केल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप मागविण्यात आली आहे.

गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचे मत समर्पित होईल का ? असे म्हणत चक्क सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत. आपले मतदान हे देशासाठी असेल, असेही मोदींनी म्हटले होते. यावरुन काँग्रेस आणि भाकपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

यंदा १.९ कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी या मतदारांना आवाहन करत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमधील जवानांच्या नावाने मतदान मागितले आहे.