महसूल विभागानंतर आता वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना लाॅकडाऊनच्या काळात भद्रावती तालुक्यातील रेती माफियांकडून महसूल विभागाने धडक कारवाई करीत लाखो रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला असतानाच दि.२९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता वनविभागाने मांगली कंपार्टमेंटमध्ये धाड टाकून सात ट्रॅक्टर्स जप्त केले.

मांगली कंपार्टमेंटमध्ये अवैधरित्या वाळुची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी आपले सहकारी क्षेत्र सहाय्यक हनवते,वनरक्षक कांबळे,दोडके आणि शेडमाके यांच्यासह २१९ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये धाड टाकून ७ ट्रॅक्टर्स जप्त केले. सदर ट्रॅक्टर्स हे मंगेश ढेंगळे, मुनाजखाॅं पठाण,क्रिष्णा जीवतोडे, मोहन ठाकरे, अनिल दातारकर यांच्या मालकीचे असल्याचे वनविभागाने सांगितले.