‘शक्तीमान’नंतर आता दूरदर्शनवर लहान मुलांसाठी सुरू होणार ‘द जंगल बुक’ ! जाणून घ्या कधी अन् कुठं

पोलीसनामा ऑनलाईन :90 च्या दशकातील फेमस मालिका रामायण, महाभारत, सर्कस, शक्तीमान, ब्योमकेश बख्शी सध्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. मोठ्यांसोबतच आता लहानांची काळजी घेत आता दूरदर्शननं आणखी एक मालिका रिटेलीकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांचा आवडता शो द जंगल बुक पुन्हा एकदा टीव्हीवर वापली करणार आहे. दूरदर्शननं याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

मोगली 90 च्या दशकातील किड्सचा फेवरेट आहे. त्यामुळं आता मोगली पुन्हा एक टीव्हीवर येणार हे ऐकून चाहतेही खुश झाले आहेत. दूरदर्शननं याबाबत घोषणा केल्यानंतर आता अनेक युजर्स सोशलवर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ज जंगल बुकची घोषणा करताना दूरदर्शननं ट्विट केलं की, “आज (दि 8 एप्रिल 2020) पासून रोज दुपारी 1 वाजता तुमचा आवडता शो द जंगल बुक पाहू शकता.”

दूरदर्शननं असंही सांगितलं की, रमेश सिप्पीचा शो बुनियाद देखील पुन्हा प्रसारीत केला जाणार आहे. ट्विटरवरून सांगण्यात आलं आहे की, सायंकाळी 5 वाजता डीडी नॅशनलवर प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा शो बुनियाद पुन्हा प्रसारीत केला जाणार आहे.