शिवसेनेपाठोपाठ अकाली दलाने सोडली भाजपची साथ

चंदीगड : वृत्तसंस्था

भाजपच्या हिंदुत्वाच्या आघाडीतील सर्वात जुना मित्र शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा केली आहे. अजून तरी ते त्यावर ठाम आहे. शिवसेनेनंतरचा काही दशक मैत्री असलेल्या अकाली दलाने आता भाजपची साथ सोडली आहे. हरियाणामध्ये शिरोमणी अकाली दलाने स्वबळावर आगामी सार्वत्रिक निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे.

[amazon_link asins=’B07F5YKHL2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5bc60344-a42c-11e8-801d-efa807901f95′]

अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी हा स्वबळाचा नारा दिला. पंजाबमध्ये आम्ही वचन दिले असून ते पूर्ण केले. आता हरियाणाच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यासाठी सज्ज आहोत, असे सुखबीर सिंह बादल यांनी कुरुक्षेत्र येथील सभेत जाहीर केले.

अकाली दलच्या झेंड्याखाली एकत्र येत एक नवा इतिहास लिहिण्याचे आवाहन सुखबीर सिंह बादल यांनी केले. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल सत्तेत एकत्र होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपचा वारु देशभर एकामागोमाग राज्य काबीज करत गेला होता. या वारु पंजाबमध्ये काँग्रेसने अडविला. काँग्रेसने अकाली दल व भाजप युतीचा पराभव करुन सत्ता हस्तगत केली आहे.

भाजपने चार वर्षापूर्वी शिवसेनेशी युती तोडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढवून एक नंबरचा पक्ष म्हणून राज्यात पुढे आला. त्यानंतर शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार स्थापन केले आहे. आज राज्य व केंद्रात दोन्ही पक्षात युती असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी व सरकारवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा शिवसेनेने यापूर्वीच केली आहे.

आगामी निवडणुकीसाठी देशपातळीवर विरोधक एकत्र येत असल्याचे पाहून भाजपने आपल्या एनडीएतील घटक पक्षांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच अमित शहा यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेने युती करावी, यासाठी भाजपच्या केंद्रपातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

असे असताना एनडीएतील आणखी एक जुना घटक पक्ष असलेल्या अकाली दलाने हरियानात स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केल्याने भाजपच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.