मागण्यांबाबत यशस्वी तोडगा निघाल्यानंतर वाहतुकदारांचा देशव्यापी संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप अखेर मागे घेण्यात आला आहे. विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7e8bb0e-91b2-11e8-9fa0-e59bc22b1948′]

इंधनांचे वाढते दर, टोलधोरण, थर्ड पार्टी इन्शुरन्स हप्त्यांमध्ये झालेली वाढ यांसह अनेक मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांची प्रमुख संघटना ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’ने (एआयएमटीसी) हा बेमुदत संप पुकारला होता. गेले ८ दिवस सुरू असलेल्या या संपामुळे हजारो कोटींचा फटका बसला. मालवाहतूक ठप्प झाल्याने अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य वस्तूंची आवकही मोठ्या प्रमाणात घटली. दरम्यान, संप मिटल्यानंतर उद्यापासून मालवाहतूक पूर्वपदावर येऊन दिलासा मिळणार आहे.