तहसिलदार यांच्या लेखी पत्रा नंतर माजीआमदार अशोक पवार यांचे उपोषण मागे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुरचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी माजी आमदार अशोक पवार यांना शिरुर तालुक्यातील घोड धरणातून रांजणगाव गणपती एमआयडीसीचा औद्योगिक कारणांकरीता करिता होत असलेला पाण्याचा पुरवठा कपात करण्याबाबत येत्या दोन दिवसात कार्यवाही बाबत लेखी पत्र दिल्याने शिरूर तहसील कार्यालया समोर माजी आमदार अशोक पवार यांनी सुरू केलेले आमरण उपोषण काल रात्री उशिरा मागे घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार, कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, सुभाष कळमकर, नरेंद्र माने, दत्तात्रेय फराटे, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, उपसभापती बाळासाहेब नागवडे, नगरपरिषद नगराध्यक्ष वैशाली वाखारे, शिरूर पंचक्रोशीतील नेते पोपट राव दसगुडे, महेश देशमुख, माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे, नगरपरिषद शिक्षण मंडळ माजी सभापती राजेंद्र जाधवराव, बिजवंत शिंदे, अमोल शहा, सरपंच विलास कर्डिले, सुरेशकाका चव्हाण, दिनकर पाडळे, निलेश पवार, शिरूर शहर राष्ट्रवादीचे रंजन झांबरे, अमोल चव्हाण, महिला शहराध्यक्ष पल्लवी शहा, राष्ट्रवादी वकील सेलचे रवींद्र खांडरे कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपोषण दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी उपोषण स्थळी येऊन माजी आमदार अशोक पवार यांची रात्री उशिरा भेट घेतली व तहसीलदार गुरु बिराजदार याच्याशी चर्चा केली. त्या नंतर तहसिलदार गुरु बिराजदार यांनी उपोषण स्थळी येऊन पाणी टंचाई च्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी माजी आमदार अशोक पवार यांच्या आंदोलनातील मागणी बाबत झालेल्या चर्चेबाबत खुलासा दिला. लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

Loading...
You might also like