पुणे पदवीधर मतदार संघाचे ‘महाविकास’ आघाडीचे उमेदवार अरूण गणपती लाड हे विजयी झाल्यानंतर पदाधिकार्‍यांचा जल्लोष (डान्स)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण गणपती लाड हे विजयी झाल्याने, पुणे शहर काँग्रेस कार्यालय परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे हे देखील सहभागी झाले होते.