दिल्ली हिंसाचारानंतर आता मुंबईतही कलम 144 ; रॅली, मोर्चे, आंदोलनावर 9 मार्चपर्यंत ‘बंदी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी ९ मार्चपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. ९ मार्चपर्यंत रॅली, आंदोलन, आतिशबाजी यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार एका जागेवर ४ ते ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत.

दिल्लीप्रमाणे मुंबईतही भाजपला दंगल घडवून आणायची होती, असा आरोप करण्यात येत आहे. दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.