उदयनराजेंनंतर आता ‘हा’ पक्ष बदलू नेता शरद पवारांच्या ‘रडार’वर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. पवारांनी शशिकांत शिंदेंच्या निष्ठेची कदर करत त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांना एक मोठी जबाबदारी दिली आहे. शशिकांत शिंदे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडून जात असताना शशिकांत शिंदेंनी मात्र आपली निष्ठा कायम राखली.

उदयनराजे भोसले आणि गणेश नाईक विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. शरद पवारांनी उदयनराजेंचा पाडाव केल्यानंतर आता त्यांच्या निशाण्यावर गणेश नाईक आहेत. पवारांनी शिंदेंवर नवी मुंबईतील गड पाडण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे गणेश नाईकांशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादीने शशिकांत शिंदेंना पाठवल्याची चर्चा आहे. नवी मुंबई हे शशिकांत शिंदेंचे कार्यक्षेत्र आहे. याशिवाय माथाडी कामगारांमध्ये त्यांचे वजन आहे.

Visit : Policenama.com