सुशांतचा ‘दिल बेचारा’ पाहिल्यानंतर अभिनेत्री सेहनूर म्हणाली…
पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’अलीकडेच प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी त्याला खूप प्रेम व प्रतिसाद दिला. सुशांतने इमॅन्युएल राजकुमार जूनियर उर्फ मॅनीची भूमिका केली जी ऑस्टिओसर्कोमानं ग्रस्त आहे. या चित्रपटात संजना संघी कर्करोगाशी झुंज देताना दिसत आहे जी किजी बासूच्या व्यक्तिरेखेने बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.
https://www.instagram.com/p/B-c6gXNlcVP/
चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही शुक्रवारी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाल्यानंतर सुशांतचा चित्रपट पाहिला आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे आपले मत शेअर केले. ज्यामध्ये राजकुमार राव, जेनिलिया सारखे कलाकार होते. मॉरिशसची मॉडेल आणि भारताची प्रसिद्ध अभिनेत्री सेहनूर हिनंही “दिल बेचारा” चित्रपटाचा आनंद घेतला.
https://www.instagram.com/p/CDItl-LlNqw/
सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा या सिनेमाचं सेहनूरनं सोशलवरू कौतुक केलं आहे. 24 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सेहनूर म्हणाली, “जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. हा चित्रपट आपल्या आयुष्यात परिपूर्णतेने कसे जगायचं हे सांगेल. जॉन ग्रीन चा चित्रपट “फॉल्ट इन माय स्टार्स” प्रेरित “दिल बेचारा” चित्रपट जड अंत:करणाने आणि प्रेमाने पहिला.”
सेहनूरच्या ‘गर्ल फ्रेंड’ गाण्याला तिच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आगामी काळात ती एका म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे ज्याची ती तयारी करत आहे ज्यात ती स्वतः अभिनय करेल. निर्माता आणि दिग्दर्शक सेहनूर भविष्यात आणखी काही रोमांचक प्रकल्प घेऊन येत आहे.