‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’चा वापर भारतात सुरूच राहील, WHO च्या बंदीच्या एक दिवसानंतर आयसीएमआरनं सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हायड्रॉक्साईक्लोरोक्विन संदर्भात वाढणारी चिंता आणि डब्ल्यूएचओचा याच्या ग्लोबल सॉलिडॅरिटी ट्रायलला रोखण्याच्या निर्णयाच्या दरम्यान भारताने याचा वापर कोविड – 19 पासून बचावासाठी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू ठेवण्याबाबत म्हटले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलाराम भार्गव म्हणाले की, औषध सुरुवातीला मार्चमध्ये सुचवले गेले होते. त्याच्या वापरापूर्वी, एक चाचणी घेण्यात आली होती ज्यात या औषधामध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म आढळले होते.

केस स्टडीमध्ये एचसीक्यूचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीतः भार्गव
दरम्यान, भार्गव म्हणाले की, निरीक्षणासंबंधी अभ्यास आणि केस कंट्रोल स्टडीज केले जात आहेत, ज्यामध्ये एचसीक्यूचे बरेच दुष्परिणाम दिसलेले नाहीत. भार्गव यांनी कोविड – 19 विषयावर केंद्र सरकारला सूचित करत म्हंटले कि, ‘आम्हाला वाटले होते की, कोविड – 19 ला थांबविण्यासाठी हे एक प्रभावी औषध असेल आणि जैविक क्षमता, चाचणी आकडेवारी आणि त्याची उपलब्धता व सुरक्षितता पाहता आम्ही याला वैद्यकीय देखरेखीखाली अनुभवजन्य पद्धतींने वापर करण्याबाबत सुचवितो.

विशेष तोटे नाहीत परंतु फायदा होऊ शकतो : भार्गव
भार्गव म्हणाले, “ज्या आठवड्यापासून ते वापरण्याचा सल्ला देण्यात आला, तेव्हापासून आम्हाला भारताबद्दल काही डेटा (एचसीक्यू वर) मिळाला आहे, ज्यानुसार असे दिसून आले आहे की, याच्या उपयोगात कोणतीही अडचण नाही, त्याचा फायदा होऊ शकतो. एम्समध्ये वेगवेगळ्या वर्गावर केलेल्या निरीक्षणापूर्व अभ्यासात हे आढळले आहे आणि आयसीएमआर येथे केसेस कंट्रोल स्टडी केले गेले आणि दिल्लीतील तीन सार्वजनिक रुग्णालयात अभ्यास केला गेला. आम्हाला आढळले कि, हे काम करते, तसेच कधीकधी मळमळ, उलट्या किंवा चिंताग्रस्तपणाशिवाय कोणतेही मोठे दुष्परिणाम दिसले नाहीत. आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याचा वापर प्रतिरोधक औषध म्हणून चालूच राहील. ”

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयसीएमआरने सुचविला होता एचसीक्यूचा वापर
आयसीएमआरच्या डीजीने म्हटले आहे की, सरकारने अलिकडच्या सल्लागारात निमलष्करी दले आणि पोलिस कर्मचार्‍यांसारख्या आघाडीच्या कर्मचार्‍यांमध्ये एचसीक्यूचा वापर वाढविण्यास सांगितले आहे. हे त्याच्या तोटे आणि फायद्यांच्या विश्लेषणानंतर केले गेले आहे. आयसीएमआरने पहिल्यांदा मार्चमध्ये या मलेरिया विरोधी औषधाचा वापर सुचविला आणि नंतर मागील आठवड्यात पुढील वापरासाठी ही सूचना पुन्हा वाढविण्यात आली.