हनुमाना बद्दल नवे वक्तव्य ; पहा कोणी केले हे वक्तव्य 

नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान हनुमान दलित  होते असे म्हणले होते तर राष्ट्रीय अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान हे आदिवासी होते असे वक्तव्य केले होते त्याच प्रमाणे केंद्रीय मंत्री  सत्यपाल सिंह यांनी हनुमानाला आर्य म्हणले होते आता  जैन धर्माचे आचार्य निर्भय सागर यांनी हनुमान आदिवासी किंवा दलित नाही तर जैन होता असे म्हटले आहे.

‘जैन दर्शन’ मानक ग्रंथात हनुमान जैन असल्याचे दाखले दिले असून हनुमान पहिला क्षत्रिय असल्याचे म्हणले आहे. हनुमान जैन होता याचे अनेक संदर्भ जैन ग्रंथात बघायला मिळतात. तसेच हनुमान संन्यास घेऊन जंगलात राहायला गेले असे आचार्य निर्भय सागर म्हणाले आहेत. आचार्यांच्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाद उदभवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हनुमाना  बद्दल योगी आदित्यनाथ म्हणाले होते कि,

हनुमान दलित असावे कारण  भारतीय द्विप समुदायाला उत्तरे पासून दक्षिणे पर्यंत आणि  पूर्वे पासून ते पश्चिमे पर्यंत सर्वांना एकत्र करण्याचे काम हनुमानाने केले  आहे. त्यामुळे देशाला एक ठेवण्याचा हनुमानचा संकल्प असला पाहिजे. इतकेच नव्हे  तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम किशन यांच्या निवडणूक चिन्हा वर आपल्या सर्वांचा संकल्प ‘बजरंगी संकल्प’ असला पाहिजे. म्हणजेच बजरंग बलीचा संकल्प असला पाहिजे असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

हनुमाना  बद्दल सत्यपाल सिंह  म्हणाले होते कि,

वाल्मिकी रामायण आणि राम चरित्रमानस  ग्रंथाचा संदर्भ देत  सत्यपाल सिंह म्हणालेहोते कि, रामायण काळात कसलाही जातीभेद नव्हता कोणीच कोणाला जातीच्या गटात वर्गीकृत केलेले नव्हते कारण तेव्हा कोणतीच जात नव्हती असे  वाल्मिकी रामायण आणि राम चरित्र मानस ग्रंथ वाचल्यानंतर कळते असे सत्यपाल सिंह म्हणाले होते.

राजस्थान निवडणुकीच्या निमित्ताने सुरु झालेला धार्मिक युक्तिवाद थांबण्याचे नाव घेत नाही. हनुमानाच्या जातीच्या रोज नव्या संशोधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रोज नवा युक्तिवाद सादर केला जातो आहे. योगिनीं सुरु केलेला हा जातीवाद कधी थांबणार असा सवाल सामान्य हिंदूजण विचारू लागले आहेत.