अफजल गुरूचा मुलगा म्हणतो आधारकार्ड आहे, पासपोर्टही द्या.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २००१ साली संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूच्या मुलाने पासपोर्ट मिळण्यासाठी विनवणी केली आहे. यासंदर्भांतला एक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिला आहे. या व्हिडिओद्वारे अफजल गुरूचा मुलगा गालिब गुरू याने पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळण्यासाठी मला पासपोर्टची आवश्यकता आहे असे म्हंटले आहे.

काय आहे व्हिडीओ

या व्हिडिओत गालिब म्हणतो की ” मला वाटतंय मला माझा पासपोर्ट मिळाला पाहिजे. कारण यावेळेला टर्की यथे मला मेडिकल साठी स्कॉलरशिप मिळणार आहे. आता माझ्याकडे आधार कार्ड आहे मला पासपोर्ट का नाही मिळू शकत ? मी अपील करतो की मला पासपोर्ट मिळाला पाहिजे.” असे संगत त्याने पासपोर्ट मिळण्याची मागणी केली आहे.

अफजल गुरु आणि संसदेवरील हल्ला

१३ डिसेंबर २००१ ला संसदेवर अतिरेक्यांतचा हल्ला झाला. या हल्ल्याबाबत महंमद अफजल गुरू, एस. आर. गिलानी, अफसान गुरू आणि शौकत गुरू यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २९ ऑक्टोबर २००३ ला महंमद अफजल गुरू आणि शौकत गुरूची फाशी कायम; पण गिलानी आणि अफसान गुरू यांची उच्च न्यायालयाकडून मुक्तता करण्यात आली.५ सप्टेंबर २००५ ला महंमद अफजल गुरूची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षांची सक्तमजुरी. २६ सप्टेंबर २००६ ला अफजलला २० ऑक्टोबर २००६ ला रोजी फाशी देण्याचा न्यायालयाचा आदेश; अफजल गुरूकडून दयेचा अर्ज दाखल करण्यात आला.

त्यानंतर ६ मे २०१० ला अफजल गुरू याच्या दयेच्या अर्जासंबंधीची फाइल दिल्ली सरकारने चार वर्षांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविली. अफजल गुरूला फाशी द्या; पण या शिक्षेमुळे कायदा सुव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्यायला हवा, अशी शिफारस शीला दीक्षित सरकारने केली. २४ जून २०१० ला अफजल गुरूचा दयायाचनेचा अर्ज फेटाळावा, अशी शिफारस केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना केली.२३ जानेवारी २०१३ – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजलचा दया अर्ज फेटाळला. ३ फेब्रुवारी २०१३ ला राष्ट्रपती कार्यालयाकडून अफजलच्या फाशीबाबत सर्व कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपविण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ ला अफजलला तिहार कारागृहात सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली.

संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय. १३ डिसेंबर २००१मध्ये संसदेवर हल्ला करण्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू होता. अफजलला फाशी देण्यात आल्याने देशभरात आनंद साजरा होत आहे. त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास.