हत्याकांडांमुळं महाराष्ट्र हादरला ! लातूर अन् नांदेडमधील ‘दुहेरी’नंतर बीडमध्ये ‘तिहेरी’, आईसह 2 मुलांचा खून

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना राज्यातील गुन्हेगारी मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हत्याकांडांच्या घटनेमुळे आज महाराष्ट्र हादरून गेला आहे. सकाळी नांदेडमध्ये एका महाराजाचा हत्येची घटना उघड झाली असतानाच लातूरमधील निलंगा येथे होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिल्याच्या कारणावरून दोघांचा लोखंडी रॉडने खून केला. या घटनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच बीड मध्ये दुपारी आईसह दोन मुलांच्या निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे.

बीडमध्ये एकाच कुटुंबातील शेतीच्या वादातून तिघांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक तिहेरी हत्याकाडांना बीड जिल्हा हादरून गेला आहे. आई आणि दोन मुलांची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड शहरातील पेठ बीड भागात आज (रविवार) दुपारी 3 च्या सुमारास एका घरात घडली आहे.

संगीता संतोष कोकणे (वय-31) संदेश संतोष कोकणे (वय अंदाजे 10), मयूर संतो, कोकणे (वय-7) असे खून झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. संगीता आणि संदेश यांचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर मयूर याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला. आई आणि मुलांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर लहान मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु ही घटना कौटुंबिक वादातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, आज (रविवार) सकाळी नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरून गेले. नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज यांचा रात्री दीडच्या सुमारास खून करण्यात आला. तर याच मठातील बाथरुममध्ये माठापतीचे सेवेकरी भागवत शिंदे यांचा मतदेह आढळून आला.

तर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील बोळेगाव येथे मुंबईहून ट्रक घेऊन आलेल्या एका ट्रक चालकाला होम क्वारंटाईन व्हावं लागेल असे सांगण्यात आलं. याचा त्याला राग आल्याने संतापलेल्या ट्रक चालकाने अंगणात झोपलेल्या पाच जणांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like