‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानुसार कडक नियमावली लागू होती. पण आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणल्याने बहुतांश व्यवहार पूर्ववत होत आहेत. तसेच राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरु केले जात आहेत. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्य कार्यकारी समितीने 30 सप्टेंबर, 2020 आणि 14 ऑक्टोबर, 2020 दरम्यान जारी केलेले आदेश (29 ऑक्टोबर, 2020, 27 नोव्हेंबर, 2020 आणि 29 डिसेंबर, 2020) वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत हीच नियमावली 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये लागू असणार आहे. राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये हे नियम लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या गाईडलाईन्समध्ये ‘मिशन बिगीन अगेन’ या मोहिमेंतर्गत ज्या काही सवलती आणि परवानग्या देण्यात आल्या आहेत, त्या 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत तशाच राहतील, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी जारी केले आहेत.